पंढरपूर .  अमहदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमार-कुमारी निवड चाचणी खो-खो स्पर्धेमध्ये सोलापूर संघाची कर्णधार, कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लब वाडीकुरोली ची खेळाडूं कु. प्रिती काळे हिने उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्यास ५ वा क्रमांक मिळवून दिल्याबद्दल व तिची महाराष्ट्राच्या कुमारी संघात निवड झाल्याबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली चे अध्यक्ष व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. कल्याणरावजी काळे साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करुन रोख १०,०००/- रूपये बक्षीस देऊन पुढील राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या....

शेवगाव  अहमदनगर येथे आयोजित  करण्यात आलेल्या १८ वर्षेखालील कुमार - कुमारी खो - खो  स्पर्धेतून महाराष्ट्राचे खो-खो  संघ जाहीर करण्यात आले आहेत .  हे दोन्ही संघ दि.22 ते 26 सप्टेंबर 2021 भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.......

यावेळी संस्थेचे सचिव  बाळासाहेब काळे , वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य  दादासाहेब खरात , आय.टी.आय कॉलजचे प्राचार्य  संतोष गुळवे , क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक प्रा.संतोष, पाटील , प्रशिक्षक अतुल जाधव, निलेश काळे उपस्थितीत होते.
--